Lunar Eclipse October 2023 | अवकाशात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर तज्ञाचे लक्ष असते. आणि भारतीयांसाठी चंद्र आणि सूर्य हे दैवतासामान आहे. त्यासाठी चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ह्या गीष्टी अतिशय महत्वाच्या ठरतात. तसेच ह्या निसर्गाच्या बदलामुळे अनेक बदल होतात. ह्यावर्षीचे चंद्रग्रहणही असेच आहे. हे चंद्रग्रहण सर्वाना सध्या सुरु असलेल्या ऑक्टोबर महिन्यात पाहायला मिळणार आहे. यासाठी दिवस कोणता असेल आणि नेमकि वेळ काय असेल हेच आज आम्ही तुम्हाला सांगतो
कधी होणार चंद्रग्रहण?
या वर्षाचे पहिले आणि शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 रोजी म्हणजेच येणाऱ्या 7 दिवसात होणार आहे. या ग्रहणाची सुरुवात नवी दिल्लीत 28 ऑक्टोबरला रात्री 11:31 पासून होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर त्याची समाप्ती ही नवी दिल्लीत 29 ऑक्टोबर रोजी पहाटे 3:36 वाजता होईल.
कसे बघाल ग्रहण? Lunar Eclipse October 2023
अवकाशाच्या कोणत्याही भागात चंद्र दिसेल त्या ठिकाणवून ग्रहण (Lunar Eclipse October 2023) बघता येईल. तसेच नवी दिल्लीत, नैऋत्याच्या बाजूला आकाशात ग्रहण पाहिले जाऊ शकते. ग्रहणाच्या वेळी चंद्र 62° वर स्थित असेल संपूर्ण देशात होणारे हे ग्रहण भारतात पहाटे 1:45 वाजता होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. ह्यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागाचा 12 टक्के भाग हा सावलीत बुडवला जाईल. ह्यामुळे चंद्राची प्रतिकृती ही अत्यंत वेगळी दुसणार आहे. या खंडात होणार हे चंद्रग्रहण चंद्र पृथ्वीच्या सावलीतून फिरत असताना अंशतः चंद्रग्रहण होईल. हे आशिया, रशिया, आफ्रिका, अमेरिका, युरोप, अंटार्क्टिका आणि ओशनिया सारख्या खंडामध्ये दिसणार आहे.
ग्रहणात ही कामे करू नका
ग्रहण म्हणलं (Lunar Eclipse October 2023) की आपल्याकडे सुतक पाळले जाते. त्यामध्ये अनेकजण कामे करत नाहीत. ग्रहण सुटेपर्यंत एकच ठिकाणी बसून भजन, कीर्तन केले जाते. तसेच ह्या वर्षाच्या शेवटच्या चंद्रग्रहणाला देखील असेच होणार आहे.गरोदर स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धांनी जेवण किंवा कुठलेही पदार्थ खाऊ नये असं मानले जाते. ग्रहण सुरु होण्यापूर्वी अन्न आणि पाण्यामध्ये तुळशीची पाने घाला. याशिवाय तुम्ही त्यात कुशही घालू शकता.