Made In India MRI Machine : भारताने बनवली मेड इन इंडिया MRI मशीन; टेस्टची किंमत होणार कमी

Made In India MRI Machine
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । आरोग्य क्षेत्रात भारताने मोठं पाऊल टाकलं आहे. देशाने पहिले स्वदेशी MRI मशीन (Made In India MRI Machine) बनवलं आहे. हे मशीन दिल्लीतील एम्स रुग्णालयात बसवलं जाईल. त्याची क्लिनिकल चाचणी ऑक्टोबरपासून सुरू होईल. स्वदेशी मशीन तयार करण्यात आल्याने रुग्णांच्या MRI चा खर्च जवळजवळ निम्म्याने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे तसेच MRI टेस्टिंगचे रुग्णांचे पैसेही कमी होतील.

भारतात सुमारे ७० टक्के वैद्यकीय उपकरणे परदेशातून आयात केली जातात, ज्यामुळे त्यांची किंमत लक्षणीय वाढते. याचा फटका रुग्णांना सहन करावा लागतो आणि त्यांना एमआरआयसह विविध प्रकारच्या इमेजिंगवर खूप पैसे खर्च करावे लागतात. जर देशातील पहिले स्वदेशी मशीन क्लिनिकल टेस्टिंग मध्ये यशस्वी झाले, तर एमआरआयचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि लोकांना त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हीच अपेक्षा व्यक्त केली.

इतक्या दिवसांपासून आपल्याकडे परदेशी MRI मशीन होती, पण आता मेड इन इंडिया MRI मशीन असणार आहे. ज्यामुळे तपासणीच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात घट होईल. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अभियानाने देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला एक नवीन ऊर्जा दिली आहे, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. पूर्वी जग भारताला ग्लोबल मार्केट म्हणत होतं, पण आज तीच दुनिया भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पाहत आहे. यशाची ही सर्वात मोठी गोष्ट आहे, हे प्रत्येक सेक्टरमध्ये दिसून येईल, असेही मोदींनी म्हंटल.

एम्सचे संचालक डॉ. एम. श्रीनिवास यांनी पत्रकारांना सांगितले की, स्वदेशी एमआरआय मशीन भारताला वैद्यकीय तंत्रज्ञानात अधिक स्वावलंबी बनविण्यास मदत करेल. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागांतर्गत मुंबईत स्वायत्त संशोधन आणि विकास प्रयोगशाळा म्हणून स्थापन करण्यात आलेल्या या प्रमुख संस्थे आणि सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) यांच्यात १.५ टेस्ला एमआरआय स्कॅनर बसवण्यासाठी एक सामंजस्य करार देखील करण्यात आला.