धक्कादायक ! महिलेला बलात्कार झाल्याचे समजलेच नाही, पोलीसदेखील चक्रावले

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रीवा : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमधील रीवा या ठिकाणी बलात्काराचे एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. यामध्ये पीडित महिला तिच्या नवऱ्यासोबत झोपली असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचे तिला समजलेच नाही. हा सगळा प्रकार तिच्या लक्षात येईपर्यंत आरोपी तेथून पळून गेला होता. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीसदेखील चक्रावले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण ?
हि घटना मध्यप्रदेशमधील रीवा या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणात पीडित महिला तिचा नवरा आणि पाच वर्षांच्या मुलासह एका झोपडीमध्ये राहत होती. शुक्रवारी रात्री हे सर्व जण झोपलेले असताना एका व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत झोपडीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पहिल्यांदा ती व्यक्ती आपला नवरा असल्याचे त्या महिलेला वाटले. काही वेळाने तिचा नवरा बाजूला झोपल्याचे लक्षात येता तिने आरडाओरड केली. या नंतर त्या महिलेच्या आवाजाने तिचा नवरा जागा झाला. त्याने त्या आरोपीला पकडले देखील होते. पण आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेला. या घटनेनंतर दोन दिवसांनी त्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पीडित महिला राहते ती जागा खूपच छोटी आहे. यामुळे झोपडीत दुसरा व्यक्ती शिरल्याचे बाजूलाच झोपलेल्या नवऱ्याला कसे समजले नाही? हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्या महिलेने आपल्या तक्रारीत एका अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्या व्यक्तीचे तिच्या नवऱ्याबरोबर जुने भांडण आहे. सध्या ती व्यक्ती फरार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.