‘आमचासुद्धा दिवस येईल’- कमलनाथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नीतीमत्तेचं राजकारण सोडणार नाही असं म्हणत राजकारणात प्रत्येकाचा दिवस येतो असं कमलनाथ यांनी राजीनामा देण्याआधी स्पष्ट केलं. राजकारण आज आहे, उद्या आहे आणि परवासुद्धा हे सांगत आज आणि उद्या आमचा नसला तरी त्यानंतरचा दिवस आमचाच असेल असा विश्वास कमलनाथ यांनी व्यक्त केला.

बहुमत चाचणी घेण्यापूर्वीच आपल्याकडे आमदार नसल्याचं लक्षात आल्याने कमलनाथ यांनी राजीनामा देण्याचं ठरवलं. काँग्रेस पक्षाने नीतिमत्ता दाखवतच राजकारण केलं असून मध्यप्रदेशमध्ये १५ वर्षं विरोधात असतानाही आम्ही सरकारवर नैतिक दबाव टिकवण्यात यशस्वी ठरल्याचं कमलनाथ पुढे म्हणाले.

काँग्रेसचे पॉवरपॅक नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला सरकार वाचवणं अशक्य झालं होतं. बहुमत चाचणी २६ तारखेला घेण्याचा निर्णय झाल्यानंतर काहीसा दिलासा मिळालेल्या कमलनाथ यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारीच तात्काळ बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितलं. मात्र शुक्रवारच्या दिवशी अपेक्षित बहुमत नसल्याचं लक्षात येताच कमलनाथ यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. या एकूण नाट्यानंतर आता भाजप मध्यप्रदेशमध्ये पुन्हा सरकार बनवणार हे निश्चित झालं आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

 

Leave a Comment