मुंबई । चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. चीनमधील बड्या उद्योगांबरोबर नुकत्याच करण्यात आलेल्या ५ हजार कोटी रुपयांच्या ३ करारांना राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा झाल्यानंतर हे करार स्थगित करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी मॅग्नेटीक महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील उद्योग विभागाने १५ जून रोजी व्हिडोओ कॉन्फरसिंगद्वारे जगभरातील विविध कंपन्यांशी १६ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते. या १६ हजार कोटी रुपयांपैकी ५ हजार कोटी रुपयांचे करार ३ चीनच्या कंपन्यांशी करण्यात आले होते. चीन आणि भारताच्या सीमेवर २० जवान शहीद होण्याच्या आधी हे करार करण्यात आले होते.
मात्र, सीमेवर २० जवान शहीद झाल्यानंतर चीनविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. त्यामुळे चीनच्या कंपन्यांबरोबर केलेल्या या करारांचं काय करायचं याचा सल्ला राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागितला होता. केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार चीनच्या कंपन्यांबरोबर करण्यात आलेले करार स्थगित करण्यात आले आहेत. तर यापुढे चीनच्या कंपन्यांबरोबर कोणतेही करार न करण्याचा सल्लाही दिला आहे.चीनच्या कंपन्यांबरोबर व्हिडोओ कॉन्परसिंगद्वारे झालेल्या कराराच्यावेळी चीनमधील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर चीनचे भारतीय दूत सन विडोंग उपस्थित होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”