कोल्हापूर प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे आज सोमवारी (ता. १६) कोल्हापुरात आगमन होणार आहे. सांगलीवरून कोल्हापुरात येताना अंकली पुलावर त्यांचे स्वागत होणार करून इचलकरंजीत त्यांची सभा होणार आहे. तसेच मंगळवारी शहरातून यात्रा काढण्यात येणार असून कळंबा, इस्पुर्ली, मुधाळतिट्टा आणि राधानगरीत छोट्या सभा होणार आहेत. अशाप्रकारे महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मात्र याच मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निम्मिताने आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा रथ जाण्यासाठी जयसिंगपूर येथील ६० वर्षापुर्वीच्या शेकडो झाडांची कत्तल राजरोसपणे करण्यात येत आल्याची धक्कादायक बाबा समोर आली आहे. दरम्यान या वृक्षतोडीसाठी बांधकाम विभागाने परवानगी दिली नसून जयसिंगपूर पोलिसांच्या आदेशावरून ही सर्व झाडे तोडत असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले आहे.
या सर्व घटनेमुळे या भागातील वृक्षप्रेमी आणि निसर्ग प्रेमी चांगलेच संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी स्वत:च्या रानातील निलगीरीचे झाड तोडल्यावर गुन्हा दाखल करणारे वनविभाग आता या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार काय? असा सवाल सध्या त्यांच्याकडून विचारला जात आहे. तेव्हा एकीकडे ३३ कोटी वृक्ष लागवडीचे संकल्प करणारे सरकार जयसिंगपूर मधील वृक्षांबाबत एवढे उदासीन का असा सवाल नागरिकांना पडला आहे.
दरम्यान मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता ताराराणी चौकातून महाजनादेश यात्रेस सुरुवात होणार असून दाभोळकर कॉर्नर, व्हिनस चौक, दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, आझाद चौक, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, गोखले कॉलेज, ध्यानचंद हॉकी स्टेडियम, संभाजीनगर, आयटीआय मार्गे कळंबा येथे जाणार आहे. यात्रा मार्गात चौकाचौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. मात्र एकीकडे ३३ कोटी वृक्ष लागवडीचे संकल्प करणारे सरकार जयसिंगपूर मधील वृक्षांबाबत एवढे उदासीन का असा सवाल नागरिकांना पडला आहे.