Saturday, March 25, 2023

महापरीक्षा पोर्टलवर घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध

- Advertisement -

परभणी प्रतिनिधी। महापरीक्षा पोर्टलवरील घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विरोध करण्यासाठी परभणीत शेकडो परीक्षार्थी बुधवारी रस्त्यावर आले. त्यांनी शिवाजी महाविद्यालय ते जिल्हा कचेरीपर्यंत मोर्चा काढला.

परीक्षा प्रक्रिया सुलभ व पारदर्शी व्हावी या उद्देशाने जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा महापरीक्षा या पोर्टलच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. मात्र, त्यात सुसूत्रता नसल्याने उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घोटाळेबाज महापरीक्षा पोर्टलवर तात्काळ बंदी घालून परीक्षा पूर्ववत जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात यावी, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले.

- Advertisement -

परीक्षेचे नियोजन चुकीच्या पद्धतीने केले जात असल्याने त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. एखाद्या पदासाठी परीक्षेचे आवेदन भरल्यास नजीकची तीन परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा पोर्टलवर देण्यात आली. मात्र, दिलेल्या निवड क्रमाला डावलून विद्यार्थ्यांना गैरसोयीचे होईल अस दूरच परीक्षा केंद्र देण्याची किमया या पोर्टलने साधली.