व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महाबळेश्वरात थंडीचा कडाका वाढला, वेण्णालेक 8 अंशावर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असुन राज्याचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणी येथे तापमानाचा पारा कमी झाला आहे. आज सकाळी तापमानाचा पारा 11 अंशावर आला होता. तर वेण्णालेक परिसरात 8 अंशावर तापमान पोहचले आहे.

यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यानंतर पहिल्यांदाच या महिन्यात थंडीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत. सध्या महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची शनिवार व रविवार सुट्टी असल्याने पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. सकाळ- सकाळी थंडीचा कडाका, दिवसभर निसर्गाचा आनंद व रात्री उशिरापर्यंत मार्केटमध्ये खरेदी- विक्री करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वरमध्ये दाखल होत आहे.

महाबळेश्वर येथे अनेक पाॅंईट पाहण्यासाठी शनिवार, रविवार सुट्टीसाठी पुणे- मुंबईसह राज्यासह परराज्यातून पर्यंटक येतात. थंडीचा कडाका लागला असला तरी पर्यंटकांचे महाबळेश्वर हे लोकेशन नेहमीच आवडीचे ठिकाण राहिले आहे.