महाबळेश्वरला दाट धुक्याची चादर अन् पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सातारा शहर आणि काही तालुक्यांमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली आहे. थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरी आज सकाळपासून महाबळेश्वर मार्केट आणि जंगल परिसरात दाट धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळाले.

कडाक्याच्या उन्हामुळे महाबळेश्वर येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, गुरूवार पासून हवामानात बदल झाला असून पावसाचे वातावरण तयार झाले आहे. महाबळेश्वरला रस्त्यावरून जाणाऱ्या पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या वाहनांना लाईट लावून प्रवास करावा लागत आहे. कारण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पडलेले आहे.

सध्या मे महिन्यात उकाड्याने हैराण झालेले पर्यटक ठिकाणी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दर शनिवारी आणि रविवारी हजारो पर्यटक राज्यभरातून येत असतात. महाबळेश्वरच्या रस्त्यावर दाट धुके आल्याने पर्यटक याचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. दररोज 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमान असणारे महाबळेश्वरचे आजचे तापमान मात्र 21 ते 22 अंश सेल्सिअस असल्याने या ठिकाणचे वातावरण अतिशय थंड झाले आहे.

Leave a Comment