महाबळेश्वर पालिका सभा : विरोधक व मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत तहकूब सभा पार, सर्व विषय मंजूर

Mhableshwer Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाबळेश्वर कोरम अभावी बुधवारी तहकुब केलेली पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्षा स्वप्नालि शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बुधवार प्रमाणेच आज गुरूवारीही विरोधी गटातील 13 नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेला दांडी मारली. सभेच्या विषय पत्रिकेवरील सर्व विषय आजच्या सभेत मंजुर करण्यात आले. दरम्यान नगरसेवक व मुख्याधिकारी यांना या सभेत लक्ष करून त्यांचेवर टिकेची झोड उडविली.

राष्ट्रवादी व शिवसेना समर्थक नगरसेवकांनी बुधवारी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेतील पहील्या विषयावर आक्षेप घेतला होता. परंतु सत्ताधारी गटाने या 13 नगरसेवकांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष केल्याने या 13 नगरसेवकांनी बुधवारीच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला. 17 पैकी 13 नगरसेवक सर्वसाधारण सभेला गैरहजर राहील्याने सभेचा कोरम पुर्ण झाला नाही. त्या मुळे नगराध्यक्षांना कोरम अभावी ही सभा तहकुब केली. दरम्यान कोरम नसल्याने ही सभा रद्द् करण्याची मागणी मुख्याधिकारी यांनी नगराध्यक्षांना केली होती. परंतु मुख्याधिकारी यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून नगराध्यक्षांनी सभा तहकुब केली. बुधवारी तहकुब केलेली सभा गुरूवारी दुपारी साडे तीन वाजता घेण्यात येईल, असे नगराध्यक्षांनी जाहीर केले.

बुधवारी तहकुब केलेली सभा आज गुरूवारी दुपारी सुरू झाली. आज देखिल विरोधी गटातील 13 नगरसेवक सर्वसाधारण सभेला गैरहजर राहीले. एकदा कोरम अभावी तहकुब केलेल्या सभेला पुन्हा कोरमची आवश्यक्ता नसते त्या मुळे अल्प नगरसेवकांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज पुर्ण करण्यात आले. 13 नगरसेवकांनी ज्या पहील्या विषयावर आक्षेप घेतला होता. त्या विषयासह सर्व विषय आजच्या सभेत मंजुर करण्यात आले. कोरम अभावी सभा रद्द् होते परंतु नगराध्यक्षांनी सभा रद्द् न करता तहकुब करून ती सभा पुन्हा आयोजित केली अशी सभा बेकायदशीर ठरते. त्या मुळे गुरूवारीच्या सर्वसाधारण सभेला आपण उपस्थित राहु शकत नाही, असे पत्र मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी नगराध्यक्षांना दिले होते. त्या मुळे आजच्या सभेला मुख्याधिकारी या अनुपस्थितीत राहील्या.

पालिकेने 31 मार्च रोजी अशीच ऑन लाईन सभा आयोजित केली होती. त्या सभेला 13 नगरसेवकांनी दांडी मारली होती. कोरम अभावी नगराध्यक्षांनी पालिकेची ती सभा तहकुब केली होती. मुख्याधिकारी यांनी त्या वेळी देखिल सभा रद्द् करण्याची सुचना केली होती परंतु नगराध्यक्षांनी सभा रद्द् न करता तहकुब केली. 31 तारखेची तहकुब सभा नगराध्यक्षांनी 1 एप्रिल रोजी पुन्हा घेतली. त्या वेळी देखिल 13 नगरसेवकांनी सभेला दांडी मारली होती. ती सभा बेकायदेशीर असल्याने मुख्याधिकारी देखिल त्या सभेला गैरहजर राहील्या होत्या. तरी देखिल त्या वेळी अल्प नगरसेवकांच्या उपस्थितीत नगराध्यक्षांनी सर्व विषय मंजुर केले होते. असाच घटना क्रम बुधवारी आणि गुरूवारी झालेल्या सभेत घटला आहे. आता पुढील घटनाही त्याच प्रमाणे घडणार का या कडे शहराचे लक्ष लागुन राहीले आहे.

या पुर्वीच्या सर्वसाधारण सभे बाबत मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार केली होती. मुख्याधिकारी यांची ही भुमिका सत्ताधारी गटाला आवडली नाही म्हणुन आजच्या सभेत नगरसेवक कुमार शिंदे यांनी मुख्याधिकारी यांना लक्ष केले. 31 मार्च व 1 एप्रिल रोजीच्या सर्वसाधारण सभेला जिल्हाधिकारी यांची स्थगिती नाही परंतु मुख्याधिकारी यांना तसा साक्षात्कार झाला असल्याची टिका कुमार शिंदे यांनी करून आपली नाराजी व्यक्त केली. एकाच सभे बाबत मुख्याधिकारी यांनी दोन वेळा जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार केली आरोपही शिंदे यांनी केला.