छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही न्याय देणे आहे, योग्य वेळी ताकद दाखवू ; राणेंच्या टीकेला संभाजीराजेंचे सणसणीत उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये मोठी नाराजी पसरली आहे. मात्र खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका तमाम राज्यासमोर मांडली आहे. मात्र अनेकांनी त्यांच्यावर टीका केल्याचे देखील पाहायला मिळाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता संभाजी राजांनी राज्यातील अनेक नेत्यांची भेट घेतली. त्यावरूनच नारायण राणे यांनी संभाजी महाराजांवर पुण्यातील पत्रकार परिषदेत टीका केली होती. त्याला सडेतोड उत्तर छत्रपती संभाजी महाराजांनी दिले आहे. “छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे” असे संभाजी महाराजांनी म्हंटले आहे.

…तर ताकद दाखवून देऊ

संभाजी राजांनी राणे यांनी प्रत्यत्तर देताना ट्विट करीत म्हंटले आहे की, ” छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे”. असा सणसणीत टोला संभाजीराजांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे

पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी म्हंटले होते की, “संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्याने ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का?, असा सवाल राणे यांनी केला होता . संभाजीराजे मराठा समाजाबाबत जे काही योग्य काम करतील त्याला पाठिंबा असेल, असेही राणे यांनी म्हंटले होते.

Leave a Comment