नाशिकमधील लसीकरणानंतर चुंबकत्वाचा चमत्कारिक दावा ‘फोल’, अंनिसकडून सांगितले कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक येथील अरविंद सोनार यांनी कोरोनाची लस घेतल्यानंतर हाताला नाणी , लोखंडी तसेच स्टीलच्या वस्तू चिकटल्याचा दावा केला होता. याबाबतचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र आत या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. अरविंद सोनार यांच्या व्हिडिओमागील शरीरावर नाणी, चमचे आणि स्टील वस्तू चिकटण्याचे कारण सांगितले आहे.

अंनिस कडून फेसबुक पोस्ट

अंनिस कडून फेसबुक पोस्ट करण्यात आली आहे त्यामध्ये कोविडशिल्ड लसीकरण केल्यानंतर अरविंद सोनार यांच्या हाताला चिकटणाऱ्या वस्तूंच्या मागचे कारण सांगण्यात आले आहे. या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “सोनार यांच्या हाताला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा वरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. खरे तर हा प्रयोग कोणीही माणूस करून पाहू शकतो. नाणे, उलथन जरासे ओले करून घ्या आणि पोट, दंड, पाठ अशा सपाट भागावर हलकेसे दाबून ठेवा. निर्वात पोकळी निर्माण होऊन जरावेळ अशी वस्तू चिकटून राहते. पाणी सुकले की मात्र पडते हमखास!”

https://www.facebook.com/100015602171173/posts/1065096864020376/

काय आहे प्रकरण?

अरविंद सोनार यांनी 8 दिवसांपूर्वी लस घेतली होती. त्यानंतर यांच्या मुलाने युट्युबवर दिल्लीच्या एका माणसाचा नाणी चिकटतात, असा एक व्हिडिओ बघितला. जयंत सोनार यानं कोरोना लसीचं दोन लस घेतलेल्या वडिलांच्या अंगाला स्टील लोखंड,नाणं चिकटवून बघितलं तर अगदी सहज चिटकल. रवींद्र सोनार यांनी सुरुवातीला घामामुळे असा प्रकार होत असावा म्हणून अंघोळ करुन पाहिलं. अंघोळ केल्यानंतर पुन्हा एकदा नाणी आणि चमचे शरीरावर चिकटतात की नाही हे तपासलं. यावेळी पुन्हा एकदा नाणी चिकटली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर अंनिस ने अरविंद सोनार यांचा दावा फोल असल्याचे सांगितले आहे. अरविंद सोनार यांच्या घरी नाशिक मनपाच्या आरोग्य पथकाने येऊन चौकशी केली आहे. नोडल अधिकारी नवीन बाजी यांच्या उपस्थितीत ही तपासणी करण्यात आली. आरोग्य पथक सविस्तर अहवाल वरिष्ठ लेव्हलला सादर करणार आहे.त्यामुळे कोणी ही लसी संदर्भात अफवा पसरवू नये,वैद्यकीय कारण लवकरच समोर येईल, असं सागण्यात आलं आहे.

Leave a Comment