राज्य सरकारने बोलावलेलं विधानसभेचं हिवाळी अधिवेशन ही केवळ औपचारिकता- देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । राज्यात सत्तास्थापन झाल्यानंतर यासरकारने पहिलं हिवाळी अधिवेशन बोलावलं आहे. मात्र, यंदाचं हिवाळी अधिवेशन भरवून विद्यमान सरकार केवळ औपचारिकता पूर्ण करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तास्थापनेच्या वेळी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांसोबत महाविकाआघाडीतील प्रत्येक पक्षातील २ अशा ६ जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली होती. दरम्यान शपथविधी होऊन दीड आठवडा गेल्यानंतरही खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्याला धरून सरकारने बोलावलेल्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनावर आक्षेप घेतला आहे. फडणवीस म्हणाले कि,’ यंदाचं हिवाळी अधिवेशन केवळ ६ दिवसांसाठी बोलावलं गेलं आहे. राज्यात सत्तास्थापन झाल्यापासून अजूनही ना खातेवाटप झालं आहे ना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. अशा परिस्थतीत हे अधिवेशन केवळ औपचारिकता असून कोणालाही कोण उत्तरदायी आहे हे माहित नाही.’ असं म्हणत याअधिवेशनाच्या उपयुक्तेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

 

Leave a Comment