हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला दणका दिला आहे. बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या बंदला बेकायदेशीर म्हंटल असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही, तरीही कोणी बंद केला तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करा असा आदेश दिला आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर महाविकास आघाडी काय भूमिका घेते ते पाहायला हवं.
उद्या म्हणजेच २४ ऑगस्टला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. परंतु तत्पूर्वीच वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती. यानंतर आज कोर्टात याबाबत याबाबत तातडीची सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीनं गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र बंदविरोधात आक्रमक युक्तिवाद केला. सदर आरोपीला पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत, सरकारने याप्रकरणी SIT स्थापन केली आहे. मग हा महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) कशाला? असा सवाल सदावर्ते यांनी केला.
महाराष्ट्र बंद हा बेकायदेशीर- Maharashtra Bandh
यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने उद्याचा महाराष्ट्र बंद हा बेकायदेशीर ठरवला आहे. कोणत्याही पक्षाला बंदची परवानगी नाही, बंद केला तर कायदेशीर कारवाई करा असे निर्देश कोर्टाने दिले आहे. महाधिवक्ता देवेंद्रकुमार ऊपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाचे हे आदेश दिले आहेत. आता कोर्टाचा हा आदेश महाविकास आघडी पाळणार का? ते बघायला हवं. न्यायालयाचं सूचनांचे पालन न करता महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंद पुकारलाच तर पुन्हा एकदा राज्यात नव्या वादाला तोंड फुटणार हे नक्की
दरम्यान, आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करतोच. मात्र आम्ही शांततेने हे आंदोलन करणार आहोत, कोणालाही जबरदस्ती करणार नाही. आम्ही पक्ष म्हणून नव्हे तर या महाराष्ट्राचा नागरिक आणि सामान्य व्यक्ती म्हणून उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग घेणार आहोत असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटल आहे. आम्ही राजकीय पोस्टर आणि बॅनर्स उद्या लावणार नाही. बदलापूर मध्ये जे काही घडलं त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात चीड आहे आणि त्याविरोधातच आम्ही उद्याचा बंद पुकारला आहे. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून नव्हे तर या राज्याचा नागरिक या नात्याने आम्ही उद्या बंद करणार आहोत असं नाना पटोले यांनी ठामपणे सांगितलं.