शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी- विरोधकांत खडाजंगी; मुख्यमंत्री शिंदे संतापले

budget session eknath shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातलं पीक वाहून गेल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरत शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही संतापलेले पहायला मिळालं. आमचं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन यावेळी शिंदेंनी दिलं. मात्र यांनंतरही विरोधकांनाही सभात्याग कला.

अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान झालं त्यांनतर यासंदर्भांत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे पंचनामे पूर्ण झाल्यांनतर शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जाईल असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने कधीही हात आखडता घेतलेला नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहोत, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. विरोधक आणि सरकारने एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे असेही ते म्हणाले.

शिंदेंच्या या आश्वासनानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उठून काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी त्यांच्या कांद्याच्या प्रश्नावरून आवाज उठवला. सरकार म्हणतंय आम्ही कांदा आणि हरभऱ्याची खरेदी सुरु केलीय, मात्र प्रत्यक्ष तशी परिस्थिती नाही. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशी मागणी अजित पवारांनी केली. यावेळी नाफेड कांदा खरेदीवरून सत्ताधारी आणि विरोधजकांमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी पाहायला मिळाली. आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्यासारखं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली नाहीत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदानही आम्हीच दिले असं म्हणत शिंदेनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला.