मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराने दिली ‘हि’ महत्त्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या शिंदे – फडणवीस सरकार आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (maharashtra cabinet expansion) कधी होईल याची सगळेजण वाट पाहत आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल, अशी माहिती एकनाथ शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी दिली आहे. हा विस्तार झाल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळेल असेदेखील आशिष जैस्वाल म्हणाले आहेत. त्यामुळे आता या मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी महाविकास आघाडीतील नेत्यांचंही मंत्रिमंडळ विस्ताराकडे (maharashtra cabinet expansion) लक्ष लागून राहिले आहे. कारण या विस्तारानंतर महायुतीमध्ये फूट पडणार, शिंदे गटातील अनेक अस्वस्थ आमदार पुन्हा एकदा बंडखोरी करणार, अशी वक्तव्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. तसेच काही शिवसेना नेत्यांनी 2023 मध्ये मध्यावधी निवडणुका लागणार, असा दावादेखील केला होता.

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात (maharashtra cabinet expansion) संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर पडलेल्या किती आमदारांना आगामी टप्प्यात मंत्रिपद मिळेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. येत्या 19 डिसेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. त्यामुळे येत्या 10 ते15 दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..