राज्यात कोरोनाचे ९२ नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार ६६६ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळं दिवसेंदिवस कोरोबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आज महाराष्ट्रात करोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ६६६ वर पोहचला आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. तर दुसरीकडे देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूचा आकडा सुद्धा वाढत आहे.

करोनामुळे भारतात झालेल्या मृत्यूंची संख्या २३९ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासात १ हजार ३५ नवे रुग्ण सापडले आहेत. यासोबतच संपूर्ण देशातील करोनाबाधितांची संख्या आता ७ हजार ४४७ वर गेली आहे. दरम्यान, सध्या संपूर्ण देशाला एकाच प्रश्नाची उत्सुकता आहे ती म्हणजे लॉकडाऊन कधी संपणार? मात्र, अद्यापही देशात कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. दरम्यान, ओडिशा आणि पंजाब यांनी आधीच लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. ओडिशाने ३० एप्रिल तर पंजाबने १ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

Leave a Comment