डेव्हिड बेकहॅम हा आतापर्यंतचा एक सर्वोत्कृष्ट मिडफील्ड खेळाडू: रोनाल्डो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलचा महान फुटबॉलर रोनाल्डोने म्हटले आहे की इंग्लंडचा माजी कर्णधार आणि रियल माद्रिदमधील त्याचा साथीदार डेव्हिड बेकहॅम हासार्वकालीन महान खेळाडूंपैकी एक आहे.२००३ ते २००७ दरम्यान रोनाल्डो आणि बेकहॅम दोघेही प्रसिद्ध गॅलॅक्टिकोस रियल माद्रिद संघात होते.

बेकहॅमने इंस्टाग्राम लाइव्हवर रोनाल्डोला सांगितले.“मी पाहिलेल्या पहिल्या काही लोकांपैकी तू होतास,जेव्हा आपण चेंजिंग रूममध्ये गेलात तेव्हा मला क्लबमध्ये राहणे सोपे केले.”

COVID-19: Ronaldo, Beckham plan friendly between Real Valladolid ...

रोनाल्डो म्हणाला, “तू अद्भुत आहेस. माझ्यासाठी तू विश्वातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेस.” महान स्ट्राईकर पुढे म्हणाला, “ज्या प्रकारे तू बॉलला स्पर्श करायचास तुला पाहिजे तेथे आणि त्या मार्गाने बॉल अगदी आरामात नेऊ शकत होतास आणि तेही मला न पाहता.तू मला खूप बॉल्स पास केलेस ज्याबद्दल मी आभारी आहे “

विशेष म्हणजे,२००३ मध्ये बेकहॅम रिअल माद्रिदमध्ये दाखल होण्याच्या एक वर्ष आधी रोनाल्डो इंटर मिलानहून सॅन्टियागो बर्नब्यू येथे आला होता.

Ronaldo: Beckham one of the best of all time | Goal.com

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment