Maharashtra Dam Water | राज्यातील धरणांमध्ये आहे ‘इतके’ टक्के पाणीसाठा; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Dam Water | यावर्षी जुलै महिन्यामध्ये खूप जास्त पाऊस पडला. दरवर्षीच्या सरासरी पेक्षा या वर्षी खूपच जास्त पाऊस पडल. परंतु पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसत आहे. हवामान विभागाकडून देखील पावसाबद्दलचे अंदाज नेहमीच येत असतात. हवामान विभागाने ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे. परंतु जुलैमध्ये एवढा पाऊस झालेला आहे की, धरणामध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. तर आता आपण जाणून घेऊया की, कोणत्या विभागात किती साठा जमा झालेला आहे?

राज्यातील धरणांमध्ये (Maharashtra Dam Water) किती पाणी उपलब्ध आहे. याबाबतची माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यातील प्रमुख धरणांची एकूण पाणीसाठेची क्षमता ही 1430.63 टीएमसी एवढी आहे. आणि यापैकी तब्बल 965.32 टीएमसी पाणीसाठा जमा झालेला आहे. यातील मोठ्या मध्यम आणि अगदी लहान धरणांमध्ये एकूण पाणीसाठा क्षमता 1430.63 टीएमसी असून धरणांतील पाणीसाठा हा सरासरी 67.50% एवढा आह. मागील वर्षी हा पाणीसाठा केवळ 60.55% होता परंतु यावर्षी पाणीसाठा खूप वाढलेला आहे.

आपण जर प्रत्येक विभागानुसार पाहिले तर पुणे विभागातील धरणांची पाणी क्षमता ही 537.28 टीएमसी आहे. पण ही धरणे यावर्षी 83 टक्के भरलेली आहे. म्हणजेच सध्या धरणांमध्ये एकूण 446.4 टीएमसी एवढा पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त पाणीसाठा झालेला आहे. कोकण विभागाची पाणी साठवण्याची क्षमता ही 130.84 टीएमसी एवढी आहे. यावर्षी कोकणामध्ये 89.26% एवढा पाणीसाठा झालेला आहे. म्हणजेच एकूण 116.77 टीएमसी इतका पाण्यासाठी झालेला आहे.

नाशिक विभागाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही 209.61 टीएमसी एवढी आहे. यावर्षी 61. 42% पाणीसाठा झालेला आहे. म्हणजेच 128.75 टीएमए एवढा पाणीसाठा झालेला आहे. मराठवाड्यामध्ये एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही 256.45 टीएमसी एवढी आहे. परंतु यावर्षी अगदी कमी पाणीसाठा झालेला आहे. यावर्षी केवळ 26.45 टक्के एवढा पाणीसाठा झालेला आहे. म्हणजेच धरणामध्ये एकूण 67.81 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

अमरावती विभागातील धरणांचा पाणीसाठ्याची क्षमता ही 136.75 टीएमसी एवढी आहे. या धरणांमध्ये सध्या 63.84% म्हणजेच 83.91 टीएमसी एवढा पाणीसाठा झालेला आहे. नागपूर विभागातील आपण धरणांची माहिती पाहिली, तर यामध्ये 162.70 टीएमसी एवढी पाणी साठवण्याची क्षमता आहे. यावर्षी यामध्ये 122.3 टीएमसी एवढा पाणीसाठा झालेला आहे.