10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

0
68
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे  । राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण मंत्रालयानं मोठी घोषणा केलीय. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. 10 वी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार असून 12 वी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. कोरोनाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीर मंडळाच्या प्रचलित कालावधीमध्ये परीक्षा आयोजित न करता शासन मान्यतेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या वेळापत्रक बदलण्यात आलंय. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षा आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 10 वी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

त्यानुसार 10 वी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे, तर 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तसेच महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, यासाठी एप्रिल-मे 2021 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकाही जाहीर करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here