मुंबई प्रतिनिधी |महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्या निवडक मतदारसंघाची चर्चा राजकीय पटलावर जोरदार झाली त्या मतदारसंघापैकी एक हा शिरूर मतदारसंघ होता. बारामतीच्या शरद पवारांनी मनावर घतलेला मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख निवडणुकीच्या काळात झाली होती. अशात अमोल कोल्हे यांच्या सारखा अभिनेता मैदानात उतरवून राष्ट्र्वादीने शिरुरच्या राजकारणात चांगलेच रंग भरले. मात्र एक्सिट पोलच्या अंदाजानुसार अमोल कोल्हे यांना पराभवाचे तोंड बघावे लागणार असल्याचे बोलले जाते आहे.
Exit Poll`s : महाराष्ट्रात युतीला मिळणार एवढ्या जागा तर कॉंग्रेस आघाडी मिळणार दोन आकडी जागा
एका मराठी वृत्तवाहिनीने काढलेल्या एक्सिट पोल नुसार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मैदान राखणार असल्याची चर्चा आहे. तर शिवसेना लोकसभेच्या निवडणुकीत जंग जंग पछाडलेल्या अमोल कोल्हेंना पराभवाचा सामना करावा लागणार आहे असे या सर्व्हेत म्हणण्यात आले आहे.
Exit Polls : ‘या’ राज्यात भाजपसाठी असणार धक्कादायक निकाल ; मिळणार फक्त २२ जागा
विलास लांडे यांचे नाव पुढे करून अचानक अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीत आयात करून तिकीट देण्यात आले. विलास लांडे यांच्या सारख्या नेत्याला पक्षाने डावलल्याने या पट्ट्यातील राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या नाराजीचा फटका मोठया प्रमाणात अमोल कोल्हे यांना बसणार आहे. तर आढळराव खासदार झाल्यास त्यांना मंत्रिपद मिळेल, अभिनेता खासदार झाल्यास आपल्या प्रश्नाना न्याय देऊ शकणार नाही हे लोकांना पटलेले मुद्दे आढळराव पाटलांना या वेळी तारून नेणार आहेत.अर्थात आढळराव पाटील यावेळी खासदारकीचा चौकार मारण्याची दाट शक्यता आहे.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
#LoksabhaResult : म्हणून होऊ शकतो राजू शेट्टींचा पराभव ?
शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या चारा छावणीतील भ्रष्टाचार उघड
धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान
सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी
पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज