हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या वर्षी राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान केलं. दरम्यान, राज्यात निवडणूक पार पडल्या आणि मोठ्या सत्तासंघर्षानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झालेल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यन्तचे कर्जमाफी जाहीर केली. दरम्यान, या कर्जमाफीनंतर विरोधाकांकडून टीका झाली. मात्र, सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या दीर्घ मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी संदर्भात महत्वाचं विधान केलं आहे.
मी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला असून, दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या मार्च महिन्यापासून ही योजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दोन लाखांपर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे, ते पूणपणे माफ होणार असून त्याच्या सातबारावरून ही पीककर्ज काढून टाकलं जाणार आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
या मुलाखतीत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ही योजना कार्यान्वित करत असताना राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊनच या योजना तयार करण्यात येणार आहेत. मला करायची असेल तर आताही ती घोषणा मी करू शकतो. असं नाही की योजना तयार नाही. योजना तयार केल्यानंतर ती अमलात आणण्याची तयारी झाल्यानंतर ती अमलात आणावी लागते. असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मुलाखतीत दिलं.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.