हिंगणघाट जळीतकांड पीडितेच्या उपचारासाठी सरकारकडून आर्थिक मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंगणघाटमधील जळीतकांड प्रकरणी पीडितेच्या उपचारासाठी राज्य सरकारकडून ४ लाखांची रक्कम ऑरेंज सिटी रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ही आर्थिक मदत दिली गेली आहे. याचबरोबर पीडीतेच्या उपचारासाठी गरज भासल्यास आणखी आर्थिक मदत देण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे.

काल मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून पीडितेला आर्थिक मदत देण्याबाबत माहिती दिली गेली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंगणघाट येथील प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याच्या करण्यात आलेल्या प्रयत्नाची गंभीर दखल घेतली असून दोषीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा आशयाचं ट्विट करून मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती दिली होती.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा