रेशीम उत्पादकांसाठी खुशखबर; राज्य सरकारने वितरित केला ६२. ७४ लाख रुपयांचा निधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील रेशीम बीज  कोष उत्पादक शेतकऱ्यांनी  विक्री केलेल्या कोषाची रक्कम अदा करण्यासाठी व नवीन अंडी पूंज निर्मितीसाठी  महाराष्ट्र सरकारकडून  ६२. ७४ लाख  रुपयांचा निधी  वितरित करण्यात आला आहे. या संदर्भात राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री  राजेंद्र पाटील यड्रावर यांनी  सदर निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर निधी नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे संचालक यांच्याकडे वितरित करण्यात आला आहे.

राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना  दर्जेदार अंडीपुंजाचा पुरवठा व्हावा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे  महाराष्ट्र सरकारचे तुती अंडीपुंज निर्मिती केंद्र आहे. अंडी पुंज तयार करण्यासाठी  बीज कोषाची खरेदी या केंद्रामार्फत करण्यात येते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व आसपासच्या परिसरातील शेतकरी तुती रेशीम तसेच गडचिरोली , भंडारा, चंद्रपूर व गोंदिया  जिल्ह्यातील लाभार्थी किंवा लाभार्थी शेतकरी टसर रेशीम कोषाचे उत्पादन घेऊन अंडीपंजू केंद्रामध्ये  विक्री करतात. कोरोनामुळे हे निर्मिती केंद्र बंद होते, मात्र  या काळातही रेशीम संचालनालयामार्फत  शेतकऱ्यांना  अंडीपुंजाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता.

यादरम्यान राज्यातील रेशीम बीज कोष उत्पादक शेतकऱ्यांनी  विक्री केलेल्या कोषाची रक्कम अदा करण्यासाठी  शासनामार्फत निधीची आवश्यकता होती. याबाबत मुंबई येथे वस्त्रोद्योग राज्यमंत्री यड्रावर यांच्याप्रमुख उपस्थितीत रेशीम कोष संदर्भात केंद्र शासनाकडून आलेल्या निधीमध्ये राज्य सरकारने  सहभाग अनुदानाची  तरतुद करणे बाबत  आढावा  बैठक पार पडली. हा निधी वितरित करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”