मुंबई । कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे अनिवार्य आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क हे सर्वात महत्वाचे कवच आहे. त्यामुळं याकाळात मास्कचा काळा बाजार केल्या जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. याशिवाय बऱ्याचं ठिकाणी मास्कची चढ्या दराने विक्री होत असल्याचे दिसले. म्हणून मास्कच्या विक्री दराबाबत राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याचे संकेत मिळत आहेत.
यापुढे एन ९५ मास्क किंवा कोणताही मास्क एका ठराविक किंमतीतच विकावे लागेल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. याबाबत ४ दिवसात निर्णय घेतला जाणार आहे.शासकीय तसेच खासगी डॉक्टर्सना देखील सुरक्षा इंशुरन्स कवच आहे. आयएमएची मागणी मान्य करण्यात आली. खासगी डॉक्टरांनी आणखीन ज्यास्त रुग्णसेवेसाठी पुढे यावे असेही टोपे म्हणाले.
परदेशात आरोग्याकडे ज्यास्त लक्ष दिलं जात मात्र आपल्याकडे आरोग्य सुविधांकडे यापूर्वी दुर्लक्ष होत होत. आपण रस्ते किंवा अन्य विकास कामांकडे आपल्यात यापूर्वी काम होत होत असे आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले. पण कोविडमुळे आरोग्य सुविधेसाठी जास्त काम करावं लागलं असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे पुढे म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”