राज्य सरकार शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देणारे विधयेक आणण्याच्या तयारीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज मुस्लिमांना सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये ५ टक्के आरक्षण देण्यासंबंधी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना ५ टक्के कोटा उपलब्ध करुन देण्याचे विधेयक सादर केले जाईल अशी माहिती नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.

“सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांन ५ टक्के आरक्षण देण्याची भूमिका उच्च न्यायालयाने घेतली होती. मागील सरकारने यावर कोणतीही कार्यवाही केलेली नव्हती, म्हणून आम्ही लवकरात लवकर कायद्याच्या रूपाने उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करू. ” असं नवाब मलिक म्हणाले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment