हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडी सरकारकडून नेहमी निशाणा साधला जात असल्यामुळे राज्यपाल चर्चेत राहत आहेत. दरम्यान ते आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते म्हणजे मराठी भाषेच्या मुद्यावरून यवतमाळ येथील एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी मराठी भाषे संदर्भात आग्रही भूमिका घेतली. हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमात मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावे, असे राज्यापालांनी म्हंटले.
यवतमाळ येथील एका कार्यक्रमास राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये कार्यक्रमात इंग्रजीत करण्यात आलेल्या सूत्रसंचालनाबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच ते म्हणाले की, “हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमामंध्ये मराठीतचं सूत्रसंचालन व्हायला पाहिजे. मराठी भाषा ही मातृभषा आहे याचे भान राखले पाहिजे, राज्यात सर्वत्र मराठी भाषा अनिवार्य असली पाहिजे, असे राज्यपालांनी म्हंटले.
पुढे राज्यपाल म्हणाले की, मराठी ही भाषा संस्कृत आणि हिंदी प्रमाणेच गोड आहे. मराठी भाषा सरळ, साधी आहे. मराठीचं वाचन करु शकतो आणि समजू शकतो. त्यामुळे कार्यक्रमांमध्ये मराठीत सूत्रसंचालन करणे आवश्यक आहे.