अहमदनगर । भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना त्यांच्या मूळगावी मोठा धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी खूर्द गावातील 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. लोणी खूर्द गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला आहे. (Maharashtra gram panchayat election results 2021 Radhakrishna Vikhe Patil lost Loni Khurd Gram Panchayat Election)
लोणी खुर्द गावात सत्तांतर
लोणी खुर्द हे राधाकृष्ण विखे-पाटलांचं गाव आहे. या गावात विखे पाटलांची 20 वर्षांपासून सत्ता होती. 17 पैकी 13 जागांवर परिवर्तन पॅनेलनं विजय मिळवल्यानं अवघ्या 4 जागांवर विखे पाटील समर्थकांचं पॅनेल विजयी झाले.
जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनल विजयी
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला. जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनेलनं 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. लोणी खूर्दमधील संत्तांतर हे विखे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता तालुक्यातील सहा ग्रामपंचयाती विखेंनी बिनविरोध केल्या होत्या.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’