ही घ्या यादी! पालघर घटनेत एकही मुस्लीम नव्हता- गृहमंत्री अनिल देशमुख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात करोनाचं मोठं संकट आहे. या संकटाचा एकजुटीने सामना करण्याचं सोडून काही लोक पालघरच्या घटनेचं जातीचं राजकारण करून मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत, असा असा चिमटा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांना काढला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्विटर लाइव्हवरून जनतेशी संवाद साधत पालघर मॉब लिंचिंग प्रकरणावर भाष्य केलं.

पालघरमध्ये दोन साधूंची झालेली हत्या अत्यंत दुर्देवी आहे. अशा घटना घडायला नकोय. ही घटना घडल्यानंतर अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी १०१ जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेत न्याय व्हावा म्हणून आम्ही हे प्रकरण तात्काळ सीआयडीकडे दिलं. पण या घटनेचा फायदा उचलून काही लोक जातीचं राजकारण करत आहेत, ही दुर्देवी घटना आहे. आज राजकारण करण्याची वेळ नाही. करोनाच्या संकटात एकत्र येऊन लढण्याची ही वेळ आहे. करोनाविरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यासाठी सर्वांचं सहकार्य हवं, असं सांगतानाच काही लोक मात्र या घटनेचं राजकारण करून मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत. त्यांनी अशी कितीही स्वप्न पाहिले तरी काही फरक पडणार नाही, असा खोचक टोला देशमुख यांनी विरोधकांना लगावला.

यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी वाधवान प्रकरणाबाबत सुद्धा माहिती दिली. ”वाधवान कुटंबीयांच्या क्वारंटाइनची वेळ आज दुपारी दोन वाजता संपत आहे. त्यामुळे आपल्या पोलीस खात्यातर्फे सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि सीबीआय यांना पत्र लिहून त्यांना आपल्या ताब्यात घ्यावं असं कळवलं आहे. सीबीआय वाधवान कुटुंबीयांना घेऊन जात नाही तोपर्यत वाधवान कुटुंब आमच्या ताब्यात राहणार आहे. सीबीआयने आमच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडे सोपवू,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.

”WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.”

 

Leave a Comment