पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींच्या मुलांची भाजपवारी सुरूच आहे. रणजीतसिंह मोहिते पाटीलांनंतर राष्ट्रवादीचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज समीर यांनी देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन भाजप प्रवेश निश्चित केला आहे.
समीर यांनी अमेरिकेतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. भारतात आल्यावर महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात काम करत आहेत. परभणी जिल्ह्यातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. तसेच वडील गणेश दुधगावकर यांच्या प्रचाराचे काम ते पाहतात. गणेश यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही.
सुजय विखे, रंजितसिह यांनी भाजप प्रवेश केल्यावर त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. म्हणूनच समीर यांनी भाजप प्रवेश करण्याची तयारी सुरु केली आहे. त्याच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला परभणीत मोठा फटका बसणार आहे. समीर भाजपमध्ये जाणार असले तरी त्यांचे वडील गणेश हे राष्ट्रवादीतच राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
रणजितसिंहांचे भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबविली…
पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा
बैलाच्या मृत्यूने कुटुंबीय हेलावले ; लाडक्या राजाचा दशक्रिया विधी सर्वत्र चर्चेत
वसंतदादा घराण्याला संपविण्याचा प्रयत्न, विशाल पाटीलांचा जयंत पाटीलांवर हल्लाबोल
रणजीतसिंह मोहिते पाटिलांनंतर राष्ट्रवादीच्या या माजी खासदाराच्या मुलाचा भाजप प्रवेश