सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
वसंतदादा पाटील यांचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. प्रतीक यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला साताऱ्यानंतर सांगलीत मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले असून यापुढे वसंतदादा पाटील यांच्या समाजकार्य करत राहणार असल्याचे त्यांनी वसंतदादा गटाच्या मेळाव्यात त्यांनी सांगितले. यापुढे कोणत्याही राजकारणात भाग घेणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे. इथून पुढे मी सक्रिय राजकारणात नसणार आहे. मी आता फक्त समाजकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाशी माझे सर्व नाते संपलेलं आहे. ज्या पद्धतीने आपल्याला वागवलं त्याच पद्धतीने त्यांना आता वागवलं पाहिजे अशा शब्दात पाटील यांनी काँग्रेसबद्दलची आपली नाराजी व्यक्त केली.
आज कृष्णेच्या काठावर असणाऱ्या वसंतदादा समधीस्थळी वसंतदादा प्रेमी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस विशाल पाटील, प्रतीक पाटील, शैलजा पाटील, जयश्री पाटील, महेंद्र लाड, सत्यजित देशमुख, प्रकाश आवाडे, आर आर पाटील यांचे बंधू सुरेश पाटील, आनंदा डावरे यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीसाठी जिल्ह्यातून दादा प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतर महत्वाचे –
उत्तर मुंबईत काँग्रेसचा हा ठरणार नवा उमेदवार ?
गडचिरोलीच्या जंगलातून लाखोंचे सागवान जप्त, प्राणहीता नदीतून चालतेय अवैध्य वाहतूक
धरणात तरंगत होता अनोळखी महिलेचा मृतदेह, आत्महत्या की खून अजून अस्पष्ट