अखेर ‘त्यांनी’ अण्णांची लेखी माफी मागितली

1
41
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी |   जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण केले होते. त्यावेळी अण्णा हजारे हे पैसे घेऊन उपोषण करतात,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीं केले होती. या नंतर मलिक यांनी अण्णा हजारे यांची लेखी पात्रद्वारे माफी मागितली आहे.

मलिक यांनी केलेल्या टिकेप्रकरणी अण्णा हजारे यांनी २ फेब्रुवारीला मिलिंद पवार या वकिलांमार्फत मालिक यांना नोटीस पाठविली होती.त्यानंतर ‘आपण वडीधारी व्यक्ती असून आपले मन दुखावल्याने मी दिलगिरी व्यक्त करतो’ असे लेखी उत्तर मलिक यांनी अण्णांना पाठविले.
‘अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकिलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात’, असा आरोप मलिक यांनी अण्णांवर केली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मलिक यांच्या या बदनामीकारक वक्तव्याबद्दल अण्णांची माफी मागून दिलगिरी व्यक्त केली होती.परंतु मलिक यांच्या वक्तव्याचा खुलासा केला नसल्याने अण्णांनी मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती.
लोकपाल व लोकआयुक्ताच्या नियुक्तीचा कायदा संमत होऊनही अंमलबजावणी न झाल्याने अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात ३० जानेवारीपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसले होते.

 

इतर महत्वाचे – 

या कारणामुळे उदयनराजे भोसले करणार नाहीत यंदा वाढदिवस साजरा…

जनहितासाठी शिवसेना-भाजप युती….देवेंद्र फडणवीस

पानसरे यांच्या हत्येचा तपास संथ गतीने होत असल्याने निषेध

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here