‘म्हणून’ गोकुळ दूध संघावर आयकर खात्याचा छापा…

Untitled design
Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापुरातील गोकुळ दूध महासंघ कार्यालयावर काल आयकर खात्यातून छापा टाकण्यात आला. आर्थिक गैरव्यवहारामुळे हा छापा टाकण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिरगाव येथील गोकुळ कार्यालयात आयकर खात्याचे अधिकारी पाच तास तपास करत होते. या तपासामुळे कोल्हापूर आणि राज्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रामुख्याने आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची छाननी करण्यात आली.या तपासाला गोकुळ दुग्ध संघातील अनेक कर्मचाऱ्यांनी दुजोरा दिला आहे मात्र संस्थेकडून यासंदर्भात कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

गोकुळ दूध संघाची सुमारे दोन हजार कोटींची वार्षिक उलाढाल आहे. दूध संघाकडून दर महिन्याला आयकरही भरला जातो.मात्र चालू आर्थिक वर्षात आयकरची रक्कम कमी भरल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई केल्याचे आयकर विभागाने सांगितले आहे.

 
इतर महत्वाचे –

उदयनराजे भोसलें विरोधात शिवसेनेचा हा उमेदवार रिंगणार ?

महानगरपालिका शाळा बनली सुपर डिजिटल

सुजय विखे-पाटील राष्ट्रवादीतून निवडणूक लढणार ?