उदयनराजे भोसलें विरोधात शिवसेनेचा हा उमेदवार रिंगणार ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा लोकसभा मतदारसंघाची उत्सुकता शिगेला पोहोचत असतानाच भाजप हा मतदारसंघ शिवसेनेला देण्याच्या तयारीत असल्याचे समजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असे बोलले जात आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळू शकते याला दुजोरा दिला आहे.

‘सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना लढणार असल्याचा निर्णय जवळजवळ ठरला आहे. युतीचे तिकीट मला मिळाल्यास जिल्हयात परिवर्तन होईल’ असे सूचक विधान पुरुषोत्तम जाधव यांनी केले आहे. यापूर्वी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जाधव यांनी अपक्ष निवडणुक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

साताऱ्यातील राजकारणाला वेगाने घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिला असलेल्या या मतदारसंघात अजुन उमेद्वार घोषित झालेला नसून माथाडी नेते नरेंन्द्र पाटील यांचेही नाव चर्चेत आहे.

Welcome-Amy-Main1.jpg

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे – 

नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजेंनी खाल्ली एकत्र मिसळ, उदयनराजेंना बसणार झणझणीत ठसका?

उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले

पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील

Leave a Comment