परभणीत हळद उत्पादन निम्याने घटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी / जिल्हात कापूस पिकाला पर्याय म्हणून अनेक शेतकरी हळद पिकाकडे वळले होते . परंतू यंदा भयान दुष्काळी स्थितीमुळे हळद पिकाला पक्वतेच्या अवस्थेतच पाणी कमी पडत गेल्याने हळद उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली असुन सध्या जिल्हात हळद काढणी सुरू आहे.

मात्र एकरी ४० ते ५० क्विंटल चा उतारा येत असल्याने हळदीवर आशा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. लागवड , मशागत काढणीचा खर्चही निघेनासा झाला आहे.परिणामी जिल्हातील हळद उत्पादक शेतक-यांचे अर्थकारण कोलमडले आहे.

गेल्या दोन तीन वर्षांपासून कापसावर गुलाबी बोंड अळीने थैमान घातल्याने शेतकऱ्याचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापुस उत्पादनात मोठी घट होऊन कापूस लागवड, मशागत, काढणी लागवडीचा खर्च ही निघणे अवघड झाल्यामुळे जिल्हातील अनेक शेतक- यांनी यावर्षी निरोगी उत्पादनाची हमी असणाऱ्या हळदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.
इतर महत्वाचे –

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुंची हाकालपट्टी करण्याची मागणी

शेतकऱ्यांच्या आत्महत्येला फडणवीस सरकार जबाबदार – शरद पवार

गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांत उलटसुलत चर्चांना उधाण

Leave a Comment