एकदिलाने काम करून उदयनराजे भोसले यांना निवडून आणू – शिवेंद्रराजे भोसले

Untitled design T.
Untitled design T.

सातारा प्रतिनिधी /  देशाचे राजकारण व हित लक्षात घेता सर्वांनी एकदिलाने काम करून खासदार उदयनराजे भोसले यांना निवडून आणणे गरजेचे आहे.गोर गरिबांचे तारणहार व सर्वसामान्य शेतकर्‍याचे प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून शरद पवारांची ओळख आहे. ग्रामीण भागाचे हित जोपासणे हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धोरण आहे.

त्यामुळे पवारांचे हात बळकट करण्यासाठी खा. उदयनराजे भोसले यांच्या पाठिशी रहा, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. दरम्यान, जावलीच्या शेतकर्‍यांचे, बोंडारवाडी धरणाचे व येथे असणारे विविध प्रश्न खासदांनी सोडवावेत, असेही ते म्हणाले.खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ मेढा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, जि.प. चे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी सभापती सुहास गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कारण नसताना उगाचच गैरसमज पसरवण्याचे काम काही मंडळी करत असतात. त्यांच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन करून खा. उदयनराजे म्हणाले, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. विनाकारण काही लोक विषवल्ली पेरतात. मात्र त्यांना मी सांगू इच्छितो, मी म्हणजेच उदयनराजे, मी म्हणजेच शिवेंद्रराजे भोसले आणि मी म्हणजेच शशिकांत शिंदे. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी आम्ही नेहमी एकत्र होतो, आहोत आणि पुढेही सदैव राहू, असे खा. उदयनराजे भोसले यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केली.

इतर महत्वाचे –

चामोर्शी तालूक्यात वनविभागाच्या वतीने वनवणव्यावर व्यापक जनजागृती

उमेदवारी अर्ज छाननीत एक अर्ज अवैध तर २० अर्ज ठरले वैध

स्वीप मोहिम बनली लोकशाही शिक्षणाची कार्यशाळा