उत्तर मुंबईत काँग्रेसचा हा ठरणार नवा उमेदवार ?

Untitled design
Untitled design

मुंबई प्रतिनिधी | बॉलीवुड जगतातही प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रातून आगामी निवडणूक लढणार असल्याचे समोर आले आहे. उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या लढण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तसेच काही दिवसात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. उर्मिलाला काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यास भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी अशी लढत पाहायला मिळेल.

काँग्रेसकडून या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री आसावरी जोशी आणि अभिनेत्री शिल्पा शिंदे यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी हे भाजपचे तगडे उमेदवार असल्याने त्यांच्याविरोधात एखादा लोकप्रिय आणि ग्लॅमरस चेहरा देण्याची काँग्रेसची रणनीती आहे. त्यामुळेच उर्मिला मातोंडकर यांनी ही संधी मिळण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाचे –

धरणात तरंगत होता अनोळखी महिलेचा मृतदेह, आत्महत्या की खून अजून अस्पष्ट

गडचिरोलीच्या जंगलातून लाखोंचे सागवान जप्त, प्राणहीता नदीतून चालतेय अवैध्य वाहतूक

शिक्षकानेच केला शाळकरी मुलींचा विनयभंग, मिलिटरी स्कूलमधील धक्कादायक प्रकार