जळगाव प्रतिनिधी / जळगाव लोकसभेचे भाजपाचे उमेदवारउन्मेष पाटील यांच्या प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याचा मुहुर्त साधून जळगावचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते वाढवण्यात आला. यावेळी पाटील यांनी जुने जळगाव येथील मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. मात्र या कार्यक्रमाप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची अनुपस्थिती असल्याने अनेक तर्कवितर्क कार्यकर्त्यांच्या वतीने काढण्यात येत होते.
जळगाव लोकसभेचा उमेदवार बदलल्याने नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते . ए टी नाना पाटील यांचे उमेदवारी रद्द करून भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पक्षांतर्गत वाढणारी नाराजी पाहता स्मिता वाघ यांना पक्षाने माघार घ्यायला लावून आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.यामुळे भाजपा चा मधे अनेक गट निर्माण होवून अद्यापही एकमेकांविषयी नाराजी स्पष्ट आहे .
उन्मेष पाटील यांचा प्रचार उद्धाटन कार्यक्रमाला शिवसेनेने चे २ नगरसेवक सोडल्यास कोणताही पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे नाराज शिवसैनिक व पक्षातील अंतर्गत गट बाजीचे आव्हान उन्मेष पाटील यांचा समोर राहणार आहे .
इतर महत्वाचे –
एकदिलाने काम करून उदयनराजे भोसले यांना निवडून आणू – शिवेंद्रराजे भोसले
चामोर्शी तालूक्यात वनविभागाच्या वतीने वनवणव्यावर व्यापक जनजागृती