राज्यातील लॉकडाउनच्या काळात काय ‘सुरु’ काय ‘बंद’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज मध्यरात्रीपासून संपूर्ण ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाउन करण्यात आला आहे. आज जनता कर्फ्यूनंतर सुद्धा  घराबाहेर न पडण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान लॉकडाउनच्या काळात कोणत्या सेवा सुरु आणि कोणत्या बंद राहतील याबाबत आपण जाणून घेऊ या..

काय राहील बंद
१)राज्यातील एसटी, खासगी बस, मेट्रो, लोकल गाड्या बंद राहतील.
२)मंदिर, मशिदी आदी सगळी धार्मिक स्थळं बंद राहणार.
३)खासगी कंपन्यांची कार्यालये पूर्णपणे बंद राहणार.
४)५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई म्ह्णून लग्न, समारंभ आयोजित करण्यास मनाई.

काय राहील सुरु
१) जीवनावश्यक वस्तूची दुकानं खुली राहतील. यामध्ये धान्य, किराणा, दूध, भाजी अशी दुकानं खुली राहतील.
२) लॉकडाउनच्या काळात बँक सुरु राहणार आहेत.
३) शेयर बाजार सुरु राहणार.
४) शहरातील बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच सुरु राहणार.
५) रुग्णालय

यापुढे करोनाचा विषाणू गुणाकार पद्धतीनं वाढणार आहे म्हणून अत्यंत काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगताना गरज पडली तर लॉकडाऊन ३१ मार्च नंतर वाढवण्याचे संकेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. जीव वाचवणं आत्ता महत्त्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

पहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नक्की काय घोषणा केली आहे –

#BigBreaking | राज्यात संपुर्ण लाॅकडाऊन जाहीर

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

मोठी बातमी! ३१ मार्च पर्यंत मुंबईची लोकलही बंद, रेल्वे मंत्रालयाचा सर्वात निर्णय

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ६४ वरुन ७४ वर

राज्यातील लॉकडाउनच्या काळात काय ‘सुरु’ काय ‘बंद’

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास

लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!

सोळा दिवसांच्या उपचारानंतर ‍१३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात

Leave a Comment