मोठी बातमी! राज्यात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात ‘या’ 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध हे 15 जून पर्यंत लागू करण्यात आले आहेत. मात्र आता पाच टप्प्यानुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

यावेळी  संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिविटीची अट घालण्यात आली आहे. पाच टप्प्यांमध्ये अनलॉक केले जाणार आहे. या पाच टप्प्यांमध्ये ज्या जिल्ह्यात पाच टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाईड आहेत अशा संपूर्ण जिल्ह्यात अनलॉक केलं जाणार आहे.

यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये १८ जिल्हे आहेत. यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, धुळे, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम, आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत., या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात येणार आहे. या नियमाची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे. अंमलबजावणी त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करतील. तसेच दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं

या गोष्टी सुरु होणार

–रेस्टॉरंट मॉल
–गार्डन, वॉकिंग ट्रॅक सुरू होतील
–खाजगी सरकारी कार्यालयात 100% सुरू होतील
— चित्रपट शूटिंगला परवानगी
— थेटर सुरू होतील
— सार्वजनिक कार्यक्रम लग्न सोहळा यांना शंभर टक्के सूट दिली आहे.
— ई-कॉमर्स सुरू राहील.
— जिम सलून सुरू राहणार आहे
— पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही.
— बस सेवा 100% क्षमतेने
— आंतरजिल्हा प्रवासाला मुभा राहील
— इतर राज्यातून येणाऱ्या अन्वर काही निर्बंध असतील त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील.

दुसऱ्या लेव्हलमध्ये मुंबई, मुंबई उपनगर नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे मुंबईत आता सध्या लोकल सुरू होणार नाहीत हा रेट कमी झाला तर लोकल सुरू होईल असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Leave a Comment