बाळासाहेब थोरातांना धक्का ; त्यांनीच नेमलेल्या कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

1
61
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी |बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विख पाटील हा संघर्ष नगरच्या राजकारणाला नवीन नाही. मात्र बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगरचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  राहुल गांधी यांची जिल्ह्यात सभा होण्याअगोदर ठीक एक दिवस आधी  हा राजीनामा दिला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

राधा  कृष्ण विखे पाटील यांचे कॉंग्रेस मध्ये सुरु असणारे पथन बघता या राजकीय उलथा पालथीला नव्याने वेग आला आहे. करण ससाणे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत कॉंग्रेसच्या उमेदवाराला मतदान करू नका असा सल्ला आपल्या समर्थकांना दिला आहे.

या ठिकाणी राहुल गांधीची सभा घेवून विखे पाटलांना कॉंग्रेसचे ‘चले जाव’ संकेत ?

सुजय विखे पाटील यांनी भाजप प्रवेश केला तेव्हा बाळासाहेब थोरातांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांची  सभा संगमनेर मध्ये घेण्याचा घाट कॉंग्रेसने घातला आहे. त्यामुळे विखे समर्थक नाराज झाले आहेत. त्यातूनच हा राजीनामा दिला गेल्याचे बोलले जाते आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here