मुंबई । महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे. आपसातील अंर्तविरोधामुळेच हे सरकार पडेल सरकार पाडण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करणार नाही. आम्हाला त्यात अजिबात रस नाही” असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात बोलत होते.
“आतापर्यंत देशाच्या पाठिवर असं तीन पक्षांच सरकार कधीच चाललेलं नाही. देशाच्या या इतिहासात महाराष्ट्र अपवाद ठरेल असं वाटत नाही. महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद खूप टोकाला गेले आहेत. हे एक दुंभगलेलं कुटुंब आहे. हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे. आपसातील अंर्तविरोधामुळेच हे सरकार पडेल” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ठाकरे सरकार लिव्ह इन रिलेशनशिपचं सरकार असेल तर तुम्ही अजित पवार यांच्याबरोबर स्थापन केलेल्या सरकारला काय म्हणाल? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘तो एक फसलेला प्रयत्न होता. त्यामुळे त्याला कुठलं नाव देता येणार नाही’” “ज्या दिवशी हे सरकार पडेल त्या दिवशी मजबूत सरकार देण्याची जबाबदारी आमची असेल आणि आम्ही तसं सरकार देऊ” असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात अंर्तविरोधामुळेच सरकार पडेल. त्यासाठी कुठल्याही मिशनची गरज नाही असे फडणवीस यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”