अशोक चव्हाण झाले कोरोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. २५ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी आपल्या नांदेडम मतदारसंघात कोरोनाच्या उपाययोजनांची परिस्थितीची पाहणी करत होते. यावेळी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं होतं.

कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा चव्हाण नांदेडमध्ये होते. त्यानंतर विशेष रुग्णवाहिकेतून त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. इथं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. गेले १० दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, रुग्णालयात असतानाही ते कार्यरत होते. काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. कार्यक्रमात त्यांनी आपली मतंही मांडली होती. महाविकास आघाडी सरकारमधील अशोक चव्हाण यांच्याप्रमाणेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते. त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून पुन्हा काम सुरू केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”