बोम्मईंच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांची माघार; कर्नाटक दौरा स्थगित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सध्या सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्याचच राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई उद्या बेळगावला जाणार होते मात्र तत्पूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी थेट कारवाईचा इशारा दिल्यानंतर अखेर महाराष्ट्रातील मंत्र्यांनी माघार घेत आपला कर्नाटक दौरा स्थगित केला आहे. शंभूराज देसाई यांनीच एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

आम्ही ३ तारखेलाच बेळगावला जाणार होतो परंतु ६ तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही यावं असा आग्रह झाल्याने आम्ही ६ तारखेला जाणार होतो.  पण हा दिवस बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालेला दिवस आहे त्यामुळे अशा दुःखाच्या दिवशी त्यांना नतमस्तक होणं आणि श्रद्धांजली वाहणं योग्य नाही. आणि मग कर्नाटक सरकार आततायीपणा करेल. याशिवाय आमच्या जाण्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागू नये आणि कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल.

वास्तविक पाहता महाराष्ट्रातील मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी कर्नाटकात येत असतील तर त्यांना अभिवादन करून जाऊन द्यावं अशी सामंजस्याची भूमिका कर्नाटक सरकारने घेतली असती तर व्यवस्थित सगळं पार पडलं असत असेही शंभूराज देसाई म्हणाले. कर्नाटक सरकारने टोकाची भूमिका घेतल्याने महापरिनिर्वाण दिनमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून आम्ही असा निर्णय घेतला असे त्यांनी स्पष्ट केलं.