एसटीची मोफत बस प्रवास सेवा स्थगित; प्रशासकीय पातळीवर गोंधळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाऊनमुळं शहारत अडकून पडलेल्या राज्यातील नागरिकांना घरी परतण्यासाठी एसटी बस सेवा सशुल्क द्यायची की मोफत यावरून गोंधळ सुरू आहे. त्यामुळं सोमवारपासून सुरू होणारी मोफत सेवा आता अचानक स्थगित करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्य सरकारकडून याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेण्यात येईल.त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आदेशाचे गोंधळ कायम असल्याचे दिसून येते.

शनिवारी ९ मे रोजी राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी सोमवारपासून मजूर, विद्यार्थी, भाविक आणि अडकलेल्या लोकांसाठी मोफत प्रवास सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र आता एसटी बस सेवा सशुल्क द्यायची की मोफत यावरून प्रशासकीय स्तरावर गोंधळ असून एसटी महामंडळाकडून ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून येत्या काही दिवसांत सेवेबाबत निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.

दरम्यान, एसटीची कोणतीही सेवा सुरू नाही, असं सांगण्यात येत आहे. मुंबईतील बोरिवली येथील नेन्सी कॉलनी आगारात आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळं एसटी कर्मचारी आणि गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रवाशांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडत आहेत. राज्याच्या परिवहन खात्यानं घरी परतणाऱ्या नागरिकांसाठी एसटीची मोफत सेवा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एसटीकडून कोणतंही भाडं आकारण्यात येणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. तसेच यासाठी नोंद नोंदणीची नियमावली सुद्धा जारी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनिक पातळीवर गोंधळ उडल्यानं अखेर ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळं मुंबई पुण्यासारख्या शहरात अडकून पडलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”