नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग लॅबला ‘एम्स’ ची मंजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी । नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंग लॅबला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने आज मंजुरी दिली आहे.  सध्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हा परिसर सध्या हॉटस्पॉट बनल्याने ह्या लॅबचा उपयोग फार महत्व पूर्ण असणार आहे.

राज्यात अनेक ठिकाणी कोरोना विषाणूची रुग्णसंख्या कमी होत असतांना नाशिक जिल्ह्यातील संख्या मात्र ही वाढत जात असल्यामुळे चिंतेची बाब ठरत होती. मात्र एम्सच्या मंजूरीमुळे नाशिक जिल्हावासीयां साठी दिलासादायक बाब ठरली आहे.

डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र येथे कोरोना टेस्टिंग लॅब ला परवानगी मिळाली आहे. सदर लॅबमुळे आता नाशिकमध्ये जास्तीत जास्त रुग्णांच्या कोविड-१९ बाबत तपासणी होऊन अतिशय कमी वेळात अहवाल प्राप्त होतील.

‘सदर लॅबमुळे नाशिक जिल्ह्यातील रुग्णांच्या कोविड-१९ बाबत तपासणी अतिशय कमी वेळात होऊन लवकरअहवाल प्राप्त होतील व कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी या लॅबची भरीव मदत होणार आहे’, असे लॅब मंजुरी बाबत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Leave a Comment