आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क घालून स्वतःच चालवली गाडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरातील एका चहावाला कोरोना पॉझिटिव्ह समजताच एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आज मंत्रिमंडळ बैठकीला घराबाहेर पडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मास्क लावून स्वतः गाडी चालवताना दिसले.  मातोश्री परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर खबरदारी म्हणून मुख्यमंत्री ठाकरे मास्क लावून कार चालवत घराबाहेर पडले. मात्र, मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात सध्या तणाव दिसत आहेत.

मातोश्री बाहेरील कोरोनाबाधित चहावाल्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक, मातोश्रीवर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी, इतर कार्यालयीन कर्मचारी चहा पिण्यासाठी जात असल्यानं प्रशासनाची झोप उडाली आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी यांची तातडीने तापसणी करण्यात आली आहे. १७० हून अधिक कर्मचारी मातोश्रीच्या या परिसरात कार्यरत असतात. या घटनेनंतर वरिष्ठ पातळींवर हालचाली घडून मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी बदलले आहेत. मातोश्री परिसरात कर्तव्यावर असणारे बरेच पोलीस कर्मचारी या चहा विक्रेत्याकडे चहा पिण्यासाठी जात असत.

संपूर्ण राज्यात करोनानं थैमान घातलं आहे. राज्याला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्रिमंडळाला साथ घेत दिवसरात्र कामाला लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार जनतेशी संवाद साधून घराबाहेर पडू नका असं आवाहन करत आहेत. मात्र, आता मुख्यमंत्री राहत असलेल्या मोतोश्रीच्या परिसरातच आता कोरोना रुग्ण सापडल्यानं चिंतेत आणखी भर पडली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यात आज २३ नवे करोनाग्रस्त, राज्यातील आकडा पोहोचला ८९१ वर

१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

 

Leave a Comment