“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; रुपाली चाकणकरांचा सणसणीत टोला

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीदेखील व्हॅक्सिनवरून केंद्र सरकारवर टीका करत निशाणा साधला आहे. घरात नाही दाणा अन् मला व्हॅक्सिन गुरु म्हणा, असा सणसणीत टोला रुपाली चाकणकर यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विटरद्वारे हि टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टबरोबर एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. … Read more

विचित्र अपघात : कुत्र्याला वाचवण्याच्या नादात रिक्षाचालक फेकला गेला रस्त्यावर, ड्राईव्हरविना रिक्षा सुसाट (Video)

पुणे | पिंपरी चिंचवड येथील कराची चौकात कुत्र्याला वाचविण्याच्या नादात रिक्षाचा अपघात झाला आहे. यावेळी रिक्षा चालक पडल्याने ड्राइव्हरविना रिक्षा सुसाट पळाली. रविवारी दुपारी 12.22 वाजता हा अपघात झाला असून सदरचा प्रकार CCTV कॅमेऱ्यात झाला आहे. कराची चौकात आयसीआयसीआय या बँकेच्या एटीएमच्या समोर अपघात झाला. संचारबंदी असल्यामुळे सुदैवाने मोठे नुकसान झाले नाही.यावेळी तेथे असणाऱ्या युवकांनी … Read more

Crime : पुण्यात भरदिवसा तरुणाचा खून; थरार CCTV कॅमऱ्यात कैद (Video)

पुणे | शहरात भरदिवसा एका तरूणावर तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा हा खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसी चाकण परिसरातील म्हाळुंगे येथे कंपनीत पाणी पुरवठा करण्याच्या वादातून संबंधित तरूणाची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. घटनेचा थरार CCTV कॅमऱ्यात कैद झाला असून पोलिस या प्रकरणाचा … Read more

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन; पुण्यात सुरु होते उपचार

पुणे : कॉंग्रेस खासदार आणि राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे राजीव सातव यांचे आज सकाळी निधन झाले. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्याने पुण्यातील जहांगीर रूग्णालयात उपचार सुरू होते. ते मागील काही दिवस वेंटीलेटरवर होते. काही दिवसांपूर्वीच राजीव सातव यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला होता. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना न्यूमोनियाचा … Read more

भाजपच्या पोटात एक अन ओठात एक : सचिन सावंत यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. यावरून आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला केला आहे. “महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणाऱ्या भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक असते,” असे … Read more

मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकारच्या मनात पाप : विनायक मेटेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी वर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला. त्यांच्यानंतर आता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याकडून आज जोरदार टीका करण्यात आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना मेटे यांनी म्हंटल आहे कि, … Read more

भारत बायोटेक पुण्यात तयार करणार आहे कोवॅक्सिन, ऑगस्टच्या अखेरीस हा प्रकल्प सुरू होण्याचा अंदाज

covaxin

पुणे । कोवॅक्सिनची (Covaxin) निर्मिती करणार्‍या भारत बायोटेकची उपकंपनी बायोवेट प्रायव्हेट लिमिटेडने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, पुण्यातील मांजरी येथील एका प्लांटमध्ये लस उत्पादन ऑगस्टच्या अखेरीस पूर्ण कार्यान्वित होईल. एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी राजेश देशमुख यांनी बुधवारी या प्लांटला भेट दिली. मुंबई उच्च … Read more

गरज पडल्यास मराठा आरक्षण प्रश्नी एक दिवसीय अधिवेशनही घेऊ : अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्व स्तरातून मागणी होऊ लागली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहलेले पत्र राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काल पत्रकार परिषद घेत मराठा समाजाचे आरक्षण मजबूत करायचे असेल तर दोन दिवसांचे … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच नियोजन सुरु : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. सर्वत्र लसीकरणाची मोहीम युद्ध पातळीवर राबविली जात आहे. पुणे इथे वाढत असलेल्या कोरोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ” राज्यात कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात कमी … Read more

राष्ट्रवादीच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार, थोडक्यात बचावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाच्या गेटवर आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान गोळीबार झाला असला तरी सुदैवाने आमदार बनसोडे हे सुखरूप आहेत. आज दुपारच्या सुमारास कार्यालयाच्या गेटवर राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे … Read more