एकनाथ खडसेंची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती ED कडून जप्त; लोणावळा, जळगावातील मालमत्तेचा समावेश

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने धक्का दिला आहे. ईडीने खडसे यांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये जळगाव आणि लोणावळा येथील मालमत्तेचा समावेश आहे.

एकनाथ खडसे यांची भोसरी MIDC जमीन कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी कडून चौकशी सुरु होती. जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली होती. गेल्या महिण्यात खडसे यांची तब्बल 9 तास ईडीने चौकशी केली होती. आता ईडीने खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

एकनाथ खडसे फडणवीस सरकारमध्ये मंहसूल मंत्री असताना त्यांनी भोसरी MIDC येथे 3.1 एकर क्षेत्रफळाचा प्लाॅट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवाोर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. खडसे यांनी 31 कोटी रुपये मुल्य असणारा प्लाॅट 3 .7 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. खडसे यांनी रेडी रेकनर दरापेक्षा कमी बाजारभाव दाखवून हा व्यवहार केल्याचा आरोप केला जात आहे.

You might also like