‘शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण’; युवक काँग्रेस चा निर्धार

पुणे प्रतिनिधी | शेतकऱ्यांवर अन्याय करणारी ३ कृषी विधेयके राज्यसभेत मोदी सरकारनेहुकूमशाही पद्धतीने रेटून नेली ,याचा तीव्र निषेध महाराष्ट्र युवक काँग्रेसने  केला आहे.  ‘कृषीसंस्कृती कार्पोरेट  मित्रांच्या  दावणीस बांधू नका’ असा इशारा देत ‘  शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण’,असा निर्धार आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी  पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे . कृषी विधेयके मांडताना मोदी सरकारने संसदीय पद्धतीला फाटा दिला. मतदानाची विनंती फेटाळली .या विधेयकावर … Read more

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु होणार? श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हेंचे केंद्र सरकारला निवेदन

नवी दिल्ली । महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी म्हणून राजकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी या मागणीचे निवेदन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना भेटून दिले … Read more

म्हणुन त्या शेतकऱ्याने शेतातच उभारले जिवाभावाच्या बैलाचे स्मारक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैल हा शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक अगदी जवळचा सदस्य असतो. भारतीय संस्कृतीत शेतकरी बैलाला आपल्या कौटुंबिक सदस्याप्रमाणेच सन्मान देत असल्याचे आपण जाणतो.  शेतकरी आपल्या बैलांची जीवापाड काळजी घेतात. आपल्याकडे बैलांच्या  प्रेमासाठी बैलपोळा हा सण देखील साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाची खूप उत्साहात पूजा करून त्याची वाजत गाजत मिरवणूक या निमित्ताने काढली जाते.  शेतीच्या कामात … Read more

महाविकासआघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला- चंद्रकांत पाटील

पिंपरी-चिंचवड । मराठा आरक्षणाबाबत महाविकासआघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाकडून दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मराठा आरक्षण कधी मान्यच नव्हतं. मान्य होतं, तर १५ वर्षे … Read more

आरक्षण न मिळाल्यास मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा

पुणे । मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्या दृष्टीने न्यायालयात बाजू मांडण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरल्याने, मराठा समाज बळी ठरला आहे. अशा शब्दात संभाजी ब्रिगेड संघटनेने (sambhaji brigade) केंद्र, राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास मराठा समाजातील तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील, असा गंभीर इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला. मराठा … Read more

..म्हणून साबळे वाघिरे आणि कंपनीनं ‘संभाजी बिडी’चं नाव बदलण्याचा घेतला निर्णय

पुणे । शिवप्रेमींच्या तीव्र भावना लक्षात घेऊन साबळे वाघिरे आणि कंपनीनं आपल्या उत्पादनाचं ‘संभाजी बिडी’ हे नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसं पत्रकच कंपनीनं प्रसिद्धिस दिलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी बिडीचं नाव बदलण्यावरूनचा वाद सुरू होता. पुन्हा ऐरणीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडीचं नाव ठेवल्यानं त्यांचा अपमान होत असल्याचा मुद्दा शिवप्रेमींनी उचलुन धरला … Read more

‘एल्गार परिषद’ प्रकरणी NIAनं आणखी ३ जणांना केली अटक; सर्वजण कबीर कला मंचचे कलाकार

पुणे । पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणखी तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी पुण्यातील कबीर कला मंचचे कलाकार आहेत. दोघांचे माओवादी संघटनेशी संबध असल्याचा आरोप असून, एल्गार परिषद आयोजित करण्यात आलेल्या समितीचे सक्रिय सदस्य असल्याचं म्हटलं आहे. सागर गोरखे,रमेश गायचोर व ज्योती जगताप अशी त्यांची नावं … Read more

देशात कोरोनाची सर्वाधिक गंभीर परिस्थिती पुण्यात- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

पुणे । देशात कोरोनाची सर्वाधिक गंभीर परिस्थिती ही पुण्यात असल्याचं मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील कोरोनाच्या गंभीर स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आज पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. … Read more

मोदींच्या ‘मन की बात’बाबतच्या महिलेच्या पोस्टवर अश्लील कॉमेंट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाबाबत एका महिलेनं सोशल मीडियावर लिहलेल्या पोस्टवर अश्लील कॉमेंट केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात हा प्रकार घडला. एका महिलेने तिघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या प्रकरणी महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रुद्रा मराठे, अमोल बाग आणि सारंग चपळगावकर … Read more

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात ‘फुटकी पाटी’ आंदोलन; ऑनलाईन शिक्षणाला पर्याय देण्याची मागणी

पुणे प्रतिनिधी | कोरोनाच्या साथीने जगभर कहर केला आहे आणि या साथीला आटोक्यात आणण्याचा रामबाण उपाय समजून सतत टाळेबंदी केली जात आहे. यामुळे गरीब, दलित व कष्टकर्‍यांचा जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. यातच या घटकातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षण कसे घ्यायचे हा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. कारण ऑनलाईन शिक्षण हा सध्याच्या शिक्षण पद्धती मधील परवलीचा शब्द … Read more